Ad will apear here
Next
‘आषाढी वारीत अन्न सुरक्षा व स्वच्छता अभियान राबवणार’
पुणे : ‘आषाढी एकादशीनिमित्त वारीत अन्न सुरक्षा व स्वच्छता अभियान राबवणार आहे. देहू व आळंदी येथून पंढरपूरकडे जाणाऱ्या वारीच्या मार्गावरील अन्न विक्रेते व अन्न छत्र चालवणाऱ्यांना हातमोजे, टोपी, अॅप्रन आदींचा समावेश असलेले हायजिन किटचे मोफत वितरण करण्यात येणार आहे,’ अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली.  

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान सहा जुलै २०१८ व जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान पाच जुलैपासून पुणे जिल्ह्यातून पंढपूरकडे होणार आहे. देहू, आळंदी येथून पंढरपूरपर्यंत सलग १९ दिवस चालणाऱ्या  आषाढी वारीत महाराष्ट्रासह विविध प्रांतातून सुमारे १० ते १२ लाख भाविक सहभागी होत असतात. या कालावधीत पालखी मार्गावर हॉटेल, रेस्टॉरंट, फिरते विक्रेते हे अन्न पदार्थांची विक्री करत असतात. या कालावधीत सेवा भावी संस्था, सेवाभावी व्यक्ती, भाविकांना अन्नपदार्थ मोफत देत असतात.

‘यंदापासून अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने अन्नछत्राच्या तपासण्या करून वारकरी व भाविकांना सुरक्षित व स्वच्छ अन्न उपलब्ध करून दिले जाणार आहे; तसेच अन्न व्यावसायिकांचे सुरक्षा व स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. देहू ते पंढरपूर व आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मार्गावर अन्न प्रशासन, कोकाकोला इं. लि. आणि नेस्ले इं. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘परिवर्तन अन्न सुरक्षा व स्वच्छता अभियान’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार असून, पालखी मार्गावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना सुरक्षित अन्न पदार्थ तयार करण्याबाबत, तसेच अन्न सुरक्षेबाबत तज्ञ प्रशिक्षक व अन्न सुरक्षा अधिकारी प्रशिक्षण देणार आहेत. या अन्न व्यावसायिकांना हातमोजे, टोपी, अॅप्रन आदींचा समावेश असलेले हायजिन किटचे मोफत वितरण करण्यात येणार आहे,’ असे बापट यांनी सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZJVBP
Similar Posts
‘आषाढी वारीसाठी सर्व यंत्रणेने समन्वयाने काम करावे’ पुणे : ‘पंढरपूरची आषाढी वारी महाराष्ट्रातील वारकऱ्यांचा श्रद्धेचा विषय आहे. हा आनंदी सोहळा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणेने समन्वय ठेवून काम करावे,’ असे आवाहन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.
‘फिनोलेक्स’, ‘मुकुल माधव’तर्फे वारकऱ्यांची सेवा पुणे : टाळ-मृदूंगाच्या गजरात, माऊली-माऊलीच्या जयघोषात करीत आळंदीहून निघालेला वैष्णवांचा मेळा आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात पोहोचला. या वारीमार्गावर फिनोलेक्स पाइप्स व मुकुल माधव फाउंडेशनतर्फे २३ ठिकाणी वारकऱ्यांची सेवा करण्यात आली.
‘इनामदार’तर्फे वारकऱ्यांसाठी वैद्यकीय तपासणी पुणे : ‘वानवडी येथील इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आठ जुलै २०१८ रोजी हे शिबिर शीतळादेवी चौकात सकाळी सात ते सायंकाळी पाच या वेळेत होणार आहे,’ अशी माहिती हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक परवेझ इनामदार यांनी दिली
‘टाटा सॉल्ट’ने वारकऱ्यांना दिली ‘सॉल्ट-वॉटर फूट थेरपी’ पुणे : ‘टाटा सॉल्ट’ने पंढरपूरला चालत जाणाऱ्या हजारो वारकऱ्यांना ‘सॉल्ट-वॉटर फूट थेरपी’ देऊ केली आहे. मुसळधार पावसासह सर्व नैसर्गिक परिस्थितींवर मात करत ७०० वर्षांच्या पारंपरिक वारीतून पायी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या वेदना कमी करण्यासाठी ‘टाटा सॉल्ट’ने विशेष फूट एड स्टेशन्स वारीच्या अनेक थांब्यांवर स्थापन केली आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language